राहुल-यशस्वी फलंदाजीसाठी मैदानातBCCI
तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात
पुढारी ऑनलाईन डेस्क : पर्थ येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 178 धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल 62 धावा करून क्रीजवर आहे आणि यशस्वी जैस्वालने 90 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची आतापर्यंतची एकूण आघाडी 218 धावांची झाली आहे. भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर संपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 46 धावांची आघाडी होती. यशस्वीने आतापर्यंत 193 चेंडूंचा सामना केला असून त्यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर राहुलने आतापर्यंत 153 चेंडूंचा सामना केला असून त्यात 4 चौकार मारले आहेत. आजचा दिवस या कसोटीतील तिसरा दिवस असणार आहे. भारतीय संघ आज कशा पद्धतीने खेळ करतो हे महत्वपुर्ण असणार आहे. तसेच किती धावांची आघाडी मिळवतो हे निर्णायक असणार आहे.