टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i सीरिजनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलरकडे इंग्लंडची धुरा आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आधी या शेवटच्या वनडे मालिकेतून दोन्ही संघ संपूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहेत. या मालिकेत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुबमन गिल आणि केएल राहुल यांसारखे फलंदाज आहेत, जे टी 20i मालिकेचा भाग नव्हते. हे खेळाडू सामना एकहाती पालटण्याची क्षमता ठेवतात. या एकदिवसीय मालिकेनिमित्ताने उभयंसघांची एकमेकांविरुद्ध आकडे कसे आहेत? हे जाणून घेऊयात.
दोघांपैकी वरचढ कोण?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 107 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 44 वेळा पलटवार करत टीम इंडियावर मात केली आहे. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. तसेच 2 मॅच टाय झाल्यात.
टीम इंडियाची मायदेशातील आकडेवारी
टीम इंडियाची मायदेशात इंग्लंडविरुद्धची वनडे क्रिकेटमधील कामगिरी आणखी सरस आहे. टीम इंडियाने मायदेशात इंग्लंडविरुद्ध एकूण 52 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 34 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला फक्त 17 वेळाच विजयी होता आलं आहे. तर 1 सामना टाय झाला.
हे सुद्धा वाचा
टी 20i मालिकेत 4-1 ने विजय
दरम्यान टीम इंडियाने इंग्लंडचा 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता टीम इंडियाने सर्व सामने जिंकले. टीम इंडियाची ही 2025 वर्षातील पहिलीवहिली आणि टी 20i मालिका होती जी जिंकून युवा ब्रिगेडने अप्रतिम सुरुवात केली.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).