मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ यांनी अद्याप त्यांची पुढची राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र भुजबळांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप खेरै यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात लावलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. मात्र या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह देखील नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहेत. तसेच भुजबळ हे भाजपच्या वाट्यावर आहेत का? अशी चर्चा देखील नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माझे जवळचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. दिलीप खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक येथील कार्यालयात त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या!
पक्षाच्या व समता परिषदेच्या कार्यात झोकून… pic.twitter.com/TXXyLnzLns
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 4, 2025