Published on
:
04 Feb 2025, 8:25 am
Updated on
:
04 Feb 2025, 8:25 am
अकोला, पुढारी वृत्तसेवा: अकोला शहरातील गंगाधर प्लॉट मधील आरती अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची घटना आज (दि.४) सकाळी ९ च्या दरम्यान घडली. या आगीत सामान, साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अपार्टमेंट मधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सकाळी आरती अपार्टमेंट मध्ये आग लागल्याने धुराचे डोंब उठताना दिसून आले. या घटनेत लाखोंचे साहित्य जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अपार्टमेंटमध्ये ही आग कशामुळे लागली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले नाही.