उपमा नाही, बिर्याणी-चिकन फ्राय पाहिजे.. अंगणवाडीतला चिमुरड्याची मागणी; मंत्री महोदया म्हणाल्या...File Photo
Published on
:
04 Feb 2025, 6:26 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:26 am
तिरूवनंतपुरम : पुढारी ऑनलाईन
केरळच्या एका अंगणवाडीतल्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंगणवाडी मेनूमध्ये बिरयाणी आणि चिकन फ्राय देण्याची मागणी तो करत आहे. राज्याच्या मंत्री विना जॉर्ज यांनी या मुलाच्या मागणीवर विचार करत अंगणवाडीच्या मेनूमध्ये बदल करण्याचा शक्यता वर्तवली आहे.
केरळच्या एका अंगणवाडी केंद्रामध्ये मुलाचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की, अंगणवाडी केंद्रामध्ये उपमाच्या बदली बिरयाणी आणि चिकन फ्राय दिली पाहिजे. मुलाचा बिर्याणी आणि चिकन फ्राय मागणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राज्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला. त्यांनी मुलाच्या मागणीवरून आंगनवाडीच्या मेन्यूमध्ये बदल करण्यास सांगितले आहे.
या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केरळच्या बालसंगोपन केंद्रांमधील मेनू बदलण्याची शक्यता आहे. राज्याच्या आरोग्य, महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर शंकू नावाच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला.
मंत्री महोदयांनी पोस्ट केला व्हिडिओ
व्हिडिओमध्ये हा मुलगा बिरयाणी आणि चिकन फ्रायची मागणी करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत विना जॉर्ज यांनी लिहिलंय की, 'अंगणवाडीच्या मेनूमध्ये बदल होईल.' त्यांनी सांगितले की मुलाने ही विनंती निरागसतेतून केली आहे आणि त्यावर विचार केला जात आहे.
शंकू, त्याची आई आणि अंगणवाडी सेविकांचे हार्दिक अभिनंदन करताना मंत्री म्हणाले, "शंकूच्या सूचनेनुसार मेनूचा आढावा घेतला जाईल." जॉर्ज म्हणाले की, मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी अंगणवाड्यांमार्फत विविध प्रकारचे अन्न पुरवले जाते.
बोबड्या आवाजात बनवला व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये टोपी परिधान केलेला निरागस छोटा मुलगा आईला म्हणतो की, 'आई मला अंगणवाडीत उपमा ऐवजी बिरनानी (बिरयाणी) आणि पोरिचा कोझी' (चिकन फ्राय) पाहिजे.
त्या मुलाच्या आईने सांगितले की, घरात बिरयाणी खाताना हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ बनवण्यात आला. यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या 'इंस्टाग्राम' वर पोस्ट करण्यात आला. ज्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.