वांद्रे टर्मिन्समध्ये एका कुलीने ट्रेनच्या रिकाम्या डब्ब्यात महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली. राहुल अब्दुल शेख असे या आरोपीचे नाव आहे.
वांद्रे टर्मिनसमध्ये महिलेवर एका एक्स्प्रेसच्या रिकाम्या डब्यात महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना रविवारी घडली. या घटनेनंतर महिलेने तात्काळ वांद्रे जीआरपीएफ पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याची माहिती मिळताच महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. यानंतर तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. यादरम्यान रेल्वे पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव राहुल अब्दुल शेख असं असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीला दीड तासात अटक करण्यात आली असून आरोपी कुलीचं काम करत होता. तो विनापरवाना हमाल असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्शवभूमी आहे का याचीही पडताळणी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने अत्याचार केल्यानंतर पीडितेजवळचे दोन हजार रुपयेही चोरले आहे. रविवारी वांद्रे टर्मिनसमध्ये उभ्या असलेल्या उधना एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली.
Published on: Feb 04, 2025 12:13 PM