‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
मुंबई/नागपुर (Jaideep Kawade) : आज राज्यात एकूण 288 मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदान होत आहे. राज्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यात पुन्हा लाडक्या बहीनींचे महायुती सरकार येणार आहे. या बद्दल मनात कोणतीही शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी व्यक्त केला.
मतजाण्यापूर्वी जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी पत्नी सौ.प्रतिमाताई जयदीप कवाडे यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी 7 वाजता लक्ष्मी नगरातील पितळे शास्त्री शाळेत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती पीरिपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात देशाचा गेल्या दहा वर्षात शेतकरी, गोरगरीब, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यांनी राबविलेल्या विविध योजनांतून झालेल्या बदलामुळे दारिद्ररेषेतून कोट्यवधी जनता आज बाहेर पडली आहे. महायुतीचे सरकारने मोदींच्या नेतृत्वात देशात विकासाला महत्त्व दिले. नरेंद्र मोदी यांच्या कामाची दखल आज राज्यतील जागरूक मतदार घेत आहे. त्यामुळे महायुती चे सरकार राज्यात पुन्हा एकदा येणार आहे. प्रत्येक मतदार संघातून महायुतीचा मोठा विजय निश्चीत असल्याचेही जयदीप कवाडे (Jaideep Kawade) यावेळी म्हणाले.