राज्यातील साखर कामगार पगारवाढीसाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिह्यात यंदाच्या गळीत हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. साखर व त्यापासून तयार होणाऱया उपपदार्थ प्रकल्पांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व त्यांच्या सहकारी बांधवांनी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीताला कारखाने सुरू होण्याआधीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.