कोल्हापूर : महायुतीचे सात आमदार रविवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. डावीकडून आ. राहुल आवाडे, आ. अमल महाडिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ. शिवाजी पाटील.
Published on
:
25 Nov 2024, 12:42 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:42 am
कोल्हापूर : जिल्ह्यातून निवडून आलेल्या महायुतीच्या नवनिर्वाचित दहा आमदारांपैकी सात आमदार रविवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले; तर तीन आमदार शनिवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. भाजपचे आमदार अमल महाडिक, आ. राहुल आवाडे, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंदगडमधील अपक्ष आमदार शिवाजी पाटील हे रविवारी सकाळी विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, खासदार धर्यशील माने व माजी खासदार संजय मंडलिक हेदेखील रवाना झाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्तीचे आमदार डॉ. विनय कोरे आणि आमदार डॉ. अशोकराव माने शनिवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. चंदगड मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील रविवारी सकाळी महायुतीच्या आमदारांसमवेतच मुंबईला रवाना झाले.
आ. जयंत पाटीलही मुंबईला रवाना
वाळवा-इस्लामपूर मतदारसंघातून विजय मिळवलेले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील रविवारी कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.
मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित?
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महायुतीच्या घटकपक्षांतील मंत्र्यांच्या संख्येबाबत फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संभाव्य मंत्र्यांची यादी निश्चित केली जात आहे. यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हसन मुश्रीफ यांच्याही नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.