Parliament Winter Session Live |आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनFile Photo
पुढारी ऑनलाईन डेस्क : Parliament Winter Session | संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. वक्फ बोर्ड दुरुस्तीसह या अधिवेशनात सरकारकडून १६ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, नियमानुसार विषय मांडण्यात येतील, असे आश्वासन सरकारच्या वतीने बैठकीत देण्यात आले. देशाने संविधान स्वीकारले त्याला ७५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान सभागृहाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष कार्यक्रम होणार आहे. त्याबाबतही सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली.