लातूर (Latur) :- लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना खरेदी केंद्रातर्फे सोयाबीन (Soyabean)मापाला घेऊन या, असा मॅसेज येणे बंद झाले आहे. खरेदी केंद्रावरील गर्दी जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना मेसेज दिला जाणार नाही, असे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी दहा हजारांहून अधिक शेतकरी मॅसेजच्या प्रतिक्षेत आहेत.
सोयाबीन खरेदी केंद्रावरील गर्दी संपल्याशिवाय पुढचे मेसेज नाहीत
जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-याना हमीभाव केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्याबद्दल आत्तापर्यंत १०४५४३ एवढ्या शेतकऱ्यांना मेसेज गेले असून १०८५४ शेतकरी अजून मॅसेज च्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत लातूर जिल्ह्य़ातील नाफेडच्या ५२ खरेदी केंद्रातून ६१ ६७० शेतकऱ्यांकडून १५ ,५४८८० क्विंटल सोयाबीन ची खरेदी करण्यात आली आहे.
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात पणन महासंघाचे १६, केंद्र असून महाकिसान अग्रो प्रोड्युसर नगर चे २१, प्रजा शक्ती अग्रो प्रोड्युसर नगर चे १० तसेच महा किसान अग्रो प्रोड्युसर नाशिक चे ५ असे एकूण ५२ नाफडेच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी चालू असल्याची माहिती जिल्हा पणन महासंघाचे अधिकारी सोमारे यांनी दिली.
त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांतून १०८५४ जणांच्या वाट्याला मॅसेज च्या बाबतीत वेट अॅण्ड वॉच आले आहे. तर जिल्ह्य़ात खरेदी केंद्रावर रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.