Maharashtra Schools: राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण

1 hour ago 1

राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरणfile Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

16 Nov 2024, 1:50 am

Updated on

16 Nov 2024, 1:50 am

Pune: राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत नाहीत अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले.

शिक्षण आयुक्तालयाने 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. मात्र, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.

केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे आणि एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा 18 आणि 19 रोजी नियमितपणे सुरू राहतील, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article