Mumbai 26/11 Attack : मुंबईवरील 26/11 हल्ल्याशी संबंधित एका मोठा आरोपी अमेरिकन तुरुंगात बंद आहे. त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारताचा मोठा विजय झाला आहे.
court
मुंबईवर 2008 साली 26/11 चा भीषण हल्ला झाला होता. आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. तिथे आरामात आयुष्य जगत आहेत. याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वुर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारातंर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता.
(बातमी अपटेड होत आहे)