भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रिक डिव्हाईस लाँच होत असतात. अशातच स्मार्टफोन प्रेमींसाठी सॅमसंग कंपनीने त्यांचे नवे फोन लाँच केले आहेत. तर सॅमसंगने नुकतीच त्यांच्या फ्लॅगशिप फोनची प्रीमियम सीरिज गॅलेक्सी एस जागतिक स्तरावर लाँच केली आहे. लाँचिंगसोबतच कंपनीने नव्या फोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशनही सादर केले आहेत. या सीरिजमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 25, गॅलेक्सी एस 25+ आणि गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा या तीन मॉडेल्सचा समावेश करण्यात आलेला आहे.
काही महिन्यांपूर्वी ॲपलने नुकत्याच लाँच केलेल्या १६ या सीरिजच्या टॉप मॉडेलशी सॅमसंगच्या या तीन मॉडेल्स टक्कर देणार आहे. या बातमीत आम्ही दोन्ही कंपन्यांच्या प्रीमियम मॉडेल्सच्या फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धतेच्या आधारे तुलना करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
iPhone 16 Pro Max आणि Samsung Galaxy S25 Ultra या दोन्ही मॉडेल्सची किंमत काय आहे?
सॅमसंग गॅलेक्सीच्या S Series मॉडेल्स तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यातील 256GB व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे.
हे सुद्धा वाचा
तर 512GB व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत 1,49,999 रुपये इतकी असून आणि 1TB व्हेरिएंटची किंमत 1,65,999 रुपये आहे.
अशातच iPhone 16 या फोनच्या सीरिजही तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यातील 256GB व्हेरिएंटची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे. तर 512GB व्हेरिएंटची किंमत 1,64,900 रुपये आणि 1TB व्हेरिएंटची किंमत 1,84,900 रुपये आहे.
iPhone 16 Pro Max आणि Samsung Galaxy S25 Ultra ची स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S25 Ultra (सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा)
डिस्प्ले : Samsung Galaxy S25 Ultraने त्यांच्या नवीन मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत, ज्याचा परिणाम फोनच्या परफॉर्मन्सपासून तर डिझाइनपर्यंत सर्व गोष्टींवर झाला आहे. फोनचा डिस्प्ले ६.९ इंचाचा आहे. शिवाय त्याच्या कडा अधिक कर्व करण्यात आल्या आहेत.ज्याने या फोनचा लुक अगदी आकर्षक दिसत आहे.
बॅटरी : वजनाच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्राचे वजन २१८ ग्रॅम आहे. फोनमध्ये ५००० एमएएचक्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा : फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. तसेच तुम्हाला या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5 एक्स ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आले आहे. याशिवाय सेकंडरी १० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे जो ३एक्स ऑप्टिकल झूम देतो. याशिवाय एस २५ अल्ट्रामध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
प्रोसेसर : हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे, जो फोनच्या परफॉर्मन्ससह अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने काम करतात.
iPhone 16 Pro Max (आयफोन १६ प्रो मॅक्स)
डिस्प्ले : iPhone 16 Pro Max या फोनमध्ये तुम्हाला ६.० इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. आजवरच्या सर्व आयफोन फोन्समध्ये हा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. यात सुपर रेटिना एक्सडीआर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. याशिवाय कॅमेऱ्याचा अनुभव वाढवण्यासाठी ॲक्शन बटन यात जोडण्यात आलेला आहे.
कॅमेरा : iPhone 16 Pro Max मध्ये अपग्रेडेड ट्रिपल कॅमेरा सिस्टीम आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलफ्यूजन असून यात सेकंड जनरेशनचा क्वाड पिक्सल सेन्सर आहे. कॅमेरा 4के 120 व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो आणि ऑटोफोकससाठी 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील सादर करतो.