बाबुराव चांदेरेPudhari Photo
Published on
:
26 Jan 2025, 9:21 am
Updated on
:
26 Jan 2025, 9:21 am
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदेरे यांच्यावर जमिनीच्या वादातून एकाला मारहाण केली. याचा व्हिडियोदेखिल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाबुराव चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी प्रशांत शंकर जाधव (४८, रा. वारजे माळवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाबुराव चांदेरे यांच्यासह इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून विजय रौंधळ नावाच्या व्यक्तीला मारहाण करत जमिनीवर आपटले. त्यावेळी फिर्यादी देखील तेथे उपस्थित होते. या घटनेत विजय रौंधळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चांदेरे यांनी अशाच प्रकारे एका रिक्षाचालकाला यापूर्वी मारहाण केली होती. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.