बनावट स्पेअरपार्ट विक्रीFile Photo
Published on
:
18 Jan 2025, 7:31 am
Updated on
:
18 Jan 2025, 7:31 am
शहरातील आडते बाजाराजवळील तापकीर गल्लीतील ब्राह्मणी अॅटो या दुचाकीचे स्पेअरपार्ट विक्री करणार्या दुकानावर कोतवाली पोलिस व कंपनीच्या तपासी अधिकार्यांनी छापा घातला. दुकानातून दोन लाख आठ हजार 176 रूपये किमतीचा हिरो कंपनीचा बनावट माल जप्त केला. याप्रकरणी कोवताली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश सतीश जाजू (रा. तापकीर गल्ली, आडते बाजारजवळ अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कंपनीचे सचिन रगबर दयाल शर्मा (33, रा. फरीदाबाद, हरीयाणा) यांच्या फिर्याद दिली. तापकीर गल्लीतील ब्रम्हाणी ऑटो पार्ट्स नावाच्या दुकानात हिरो कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट माल विक्री केला जात असल्याची माहिती कंपनीच्या तपासी अधिकार्यांना मिळाली.
ही माहिती कोतवाली पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, अंमलदार अतुल काजळे, सचिन लोळगे, तसेच कंपनीचे तपास अधिकारी शर्मा, दीपक यादव व दोन पंच यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी दुकानाची तपासणी करण्यात आली.
तपासणीत हिरो कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट माल विक्रीसाठी ठेवलेला आढळला. सुमारे दोन लाख आठ हजार 176 रूपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे करत आहेत.