लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हैद्राबाद येथील कन्हैय्यालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद-हिस्सार एक्सप्रेसने बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) साठी प्रवास करत होते. प्रवासात ते झोपलेले असतांना नगरसुल ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख ७ हजार रूपये, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे असा २३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल होता. त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिस स्थानकांत या घटनेची फिर्याद दिल्यानंतर तेथील लोहमार्ग पोलिस आणि रेसुब कर्मचारी यांनी तपास सुरू केला. हैदराबाद एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या संशयित चार महिला मनमाड रेल्वे स्थानकात उतरल्या. येथून त्या दादर अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. पोलिस आणि रेसुबचे कर्मचारी त्यांच्या मागावर होते. दरम्यान सुरक्षा बलाच्या पथकाने - धावत्या गाडीत या महिलांना बरोबर हेरले. त्या मनमाड रेल्वे स्थानकांत सीसीटीव्हीत कैद झालेल्या होत्या. त्यांनी रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले. गौरी महाजन काळे (वय १९, रा.वालवड, जि.भूम), रेशमा किशोर भोसले (वय १९, रा. कहेटाकळी, जि.अहिल्यानगर), पूजा जीवन काळे (१९) अशी त्यांची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली सुटकेस जप्त केली. लोहमार्ग निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष शिंदे हे तपास करीत आहेत. चारपैकी एका महिलेला जामिनावर सोडण्यात आले.
Nashik Crime | एक्सप्रेसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिला टोळीस बेड्या
3 hours ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- Nashik Crime | एक्सप्रेसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिला टोळीस बेड्या
Related
सिद्धरामय्या यांना दिलासा, तर येडीयुरप्पा यांना धक्का; कर्ना...
5 minutes ago
0
Punha Kartavya Ahe | वसुंधरा तनयासमोर झुकणार का?
9 minutes ago
1
आता शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी?, राज्यातील शेतकर्य...
11 minutes ago
1
सलमान खानच्या आई 83 व्या वर्षी पडता पडता वाचल्या, व्हिडीओ पा...
12 minutes ago
1
IAS Indu Rani Jakhar | शारिरीक स्वास्थ्यासाठी स्वत:हून वेळ क...
12 minutes ago
1
कोट्यवधी खर्चूनही अशुद्ध पाणी; खानापूरमधील स्थिती
13 minutes ago
1
नवी मुंबईत शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्य...
14 minutes ago
2
Manoj Jarange Patil Video : ‘धनंजय मुंडेंनी करूणा शर्मांना घ...
16 minutes ago
1
Dhananjay Munde | धनंजय मुंडे- करुणा शर्मा वादावर मुलाची पोस...
21 minutes ago
1
आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच… वावड्या, अफवा आणि चर्चा सुरू असताना...
28 minutes ago
1
ठाणे : भाजपाच्या वाहतूक सेलने वेधले आयुक्तांसह मंत्र्यांचे ल...
29 minutes ago
1
उरणमध्ये एमआयडीसी पाईपलाईनला लागली गळती
30 minutes ago
1
© Rss Finder Online 2025. All Rights Reserved. | Designed by MyHostiT