सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ उडाला आहे. दोनदा मुदत वाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजून बाकी आहे. सरकाराला राज्यात सोयाबीनचा किती पेरा होता, किती उत्पादन झाले याचा काहीच थांगपत्ता नाही का? असा सवाल शेतकरी विचारत आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केली नसल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी अजूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. आता याप्रकरणी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
दोनदा मुदतवाढ
बारदाना नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला खिळ बसली होती. सोयाबीन खरेदी रखडली होती. खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी संपली होती. तर केंद्र सरकारने ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली. ती पण संपत आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केलेली नाही.
हे सुद्धा वाचा
काय घेतला निर्णय?
राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून 1 लाख 73 हजार 891 मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 758 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे.
इतकी सोयाबीन खरेदी
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती. 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत 5 लाख 11 हजार 667 शेतकर्यांकडून 11 लाख 21 हजार 384 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे. 14 लाख 13 हजार 269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्य राज्याला दिले होते.त्या उद्दिष्टाच्या जवळजवळ 80 टक्के सोयाबीन खरेदी राज्याने केली आहे.
नोंदणी केलेल्या 7 लाख 3 हजार 194 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 11 हजार 667 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. म्हणजे नोंदणी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 72 टक्के शेतकर्यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून 1 लाख 73 हजार 891 मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 758 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे
सोयाबीनची खरेदीसाठी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव
राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या शेतकर्यांच्या सोयाबीन खरेदी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. 562 केंद्रावर खरेदी सोयाबीनची खरेदी करण्यात आली. 11 लाख 21 हजार 3 85 टन सोयाबीनची खरेदी झाली. पाच लाख 11 हजार 6667 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी केल्याचे ते म्हणाले. सर्व गोडाऊन फुल झाल्यामुळे केंद्र शासनाकडे सोयाबीन पुन्हा खरेदी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.