शहरातील ७३७ जणांना मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. Pudhari News Network
Published on
:
15 Nov 2024, 5:33 am
Updated on
:
15 Nov 2024, 5:33 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार शहरातील ७३७ गुन्हेगारांना १६ ते २४ नोव्हेंबरपासून शहरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १२ पासून मतमोजणीच्या दिवसापर्यंत (दि.२४) मध्यरात्री १२ पर्यंत हे गुन्हेगार शहरातून हद्दपार असतील. अवैध धंदेचालक व गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर ही कार्यवाही झाली असून, त्यात राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे, भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गंभीर गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. काहींवर मकोका कारवाई केली असून, काहींना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तसेच टवाळखाेरांकडून चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र लिहून घेतले आहे.
शहरातील ७३७ जणांना मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांचाही सहभाग आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध हद्दपारी प्रस्तावित आहे. तसेच अवैध धंदे करणाऱ्या ३८९ जणांचा तर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, बलात्कार, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ३४८ जणांना हद्दपार केले आहे.
आठ दिवसांसाठी हद्दपार केलेल्या ७३७ जणांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शहर पोलिसांनी त्यांना विशिष्ट वेळेत शहरात दाखल होऊन मतदान करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २०) सकाळी सात ते दुपारी २ या वेळेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, मतदान केल्यानंतर त्यांना पुन्हा शहराबाहेर जावे लागणार आहे.
चुंचाळे - ८८, नाशिक रोड - ७९, भद्रकाली - ७७, उपनगर - ७१, इंदिरानगर - ६३, मुंबई नाका - ६०, पंचवटी - ५८, अंबड - ५४, सातपूर - ४६, देवळाली कॅम्प - ४४, आडगाव - ३५, म्हसरूळ - २५, सरकारवाडा - २४, गंगापूर - १३.
राजकीय क्षेत्राशी संबंधित हद्दपार
भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे पवन मटाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राजेंद्र उर्फ कन्नू काशीनाथ ताजणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कैलास सुरेश मुदलियार यांच्यासह भाजप व 'वंचित'मधून शिवसेना ठाकरे गटात सहभागी होणारे पदाधिकारी विक्रम नागरे आणि पवन पवार, विशाल पवार यांच्यावरही हद्दपारीची कारवाई केली