Oneplus 13 च्या आधी ‘या’ स्मार्टफोनची एन्ट्री, 6000 mAh बॅटरी आणि… फीचर्स काय ?

22 hours ago 1

भारतीय बाजरपेठेत वनप्लस स्मार्टफोनचे खुप चाहते असून या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच त्याचा फ्लॅगशिप फोन वनप्लस 13 ची स्मार्टफोन चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र हा फोन जानेवारी २०२५ मध्येच लाँच केला जाऊ शकतो असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधी भारतीय बाजारपेठेत एक शानदार फ्लॅगशिप स्मार्टफोन उद्या लाँच होणार आहे. या फोनचे नाव iQOO 13 आहे, जे स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह इतर वैशिष्ट्यांसह लाँच करणार आहे.

iQOO 13 लाँच करण्यापूर्वी कंपनीने टीझरच्या माध्यमातून या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सांगितले आहेत. या फोनमच्ये 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 120 वॉट फास्ट चार्जिंगसह 6000 mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिझाईन : iQOO 13 चे डिझाइन चायनीज व्हेरियंटसारखेच आहे. कॅमेराच्या आयलंडभोवती हॅलो लाइट्स आहेत. तसेच कंपनीने गेमर्स आणि टेक प्रेमींना मागील बाजूस आरजीबी लाइटिंग देण्यात आली आहे जी त्यांना आवडू शकते.

डिस्प्ले : आयक्यूओने डिस्प्लेच्या आकाराविषयी माहिती दिली नसली तरी यात ६.८ इंचाचा डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे. हा क्यू१० २के १४४ हर्ट्झ अल्ट्रा आयकेअर डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो.

चिपसेट : या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटचा सपोर्ट मिळेल.तसेच रियलमी जीटी 7 प्रो हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबर रोजी लाँच झाल्यानंतर iQOO 13 हा दुसरा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये हा चिपसेट देण्यात आला असून हा स्मार्टफोन उद्या लाँच केला जाणार आहे.

ओएस आणि स्टोरेज : iQOO 13 हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे. तर या फोनमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली असून २५६ जीबी ते १ टीबी इंटरनल स्टोरेज तुम्हला यात मिळू शकतो.

बॅटरी : iQOO 13 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६००० mAh क्षमतेची बॅटरी असेल. तर हा फोन १२० वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येणार आहे.

कॅमेरा : iQOO 13 या फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP वाइड कॅमेरा, 2x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा असेल. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोमध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही चांगली फोटोग्राफी करू शकता.

iQOO 13 हा फोन उद्या म्हणजेच 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन 8के रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डला सपोर्ट करेल. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि व्लॉगसाठी फ्रंट कॅमेऱ्यात ४के रिझोल्यूशन सपोर्ट मिळेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article