परभणी (Parbhani Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २ लाख २८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सु.अ. चव्हाण, ए.एम. पठाण यांच्या नेतृत्वात चार पथके तयार करुन परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्टी निर्मिती केंद्र, विक्री केंद्र, अवैध दारु वाहतूक यावर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये २० गुन्हे उघडकीस आणण्यात आले. २१ आरोपींजवळून १ हजार ३०० लिटर गुळ मिश्रित रसायन, ९० लिटर हातभट्टी दारु, ६२ लिटर देशी दारु, १४ लिटर विदेशी दारु, ३०० लिटर ताडी, दोन दुचाकी मिळून २ लाख २८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Parbhani Assembly Election) कारवाईत एम.एस. पतंगे, एच. एम. पाकलवाड, व्हि.व्हि. फुलारी, ए.बी. वेंâद्रे, एन.एन. निलमवार, आर.एम. डमरे, बी.के. गंगावणे, ए.बी. जाधव, बी.एल. ओहाळ, यु.बी. शहाणे, राहूल बोईनवाड, भिमेश्वर पुपोलवार, बालाजी कच्छवे, विजय टेकाळे, ऋषि साळवे, राम सुर्यवंशी, संदीप डहाळे, तुषार राठोड, साळंके, धापसे, चौधरी, होणमाने आदींनी सहभाग घेतला.
२१ लाख ७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात
निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागु झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७६ गुन्हे उघडकीस आणले. यात १७६ आरोपींजवळून गुळमिश्रित ७ हजार ९८० लिटर रसायन, ५२९ लिटर हातभट्टी दारु, ८०० लिटर देशी दारु, १३३ लिटर विदेशी दारु, ३८५ लिटर ताडी आणि २० वाहने व इतर साहित्य मिळून २१ लाख ७ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.