परभणी/चारठाणा (Parbhani) :- जिंतुर – जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर दुचाकीवरून जात असतांना रामेटाकळी ता.मानवत येथील एक ३५ वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात (Accident) सदर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
चारठाणा येथील त्या पुलावर अपघाताची मालिका सुरुच..
दरम्यान अपघात घडल्यानंतर अपघातस्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र मदतीस कुणी येत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ जखमी व्यक्तीस स्वतःच्या वाहनात टाकून जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital)उपचारासाठी दाखल केले. मालेटाकळी ता.मानवत येथील सुदर्शन कालिदास कदम वय ३५ हे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच २२ बि.डी.३१८८ वरून जात असतांना जिंतुर – जालना महामार्गावरील चारठाणा येथील पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी चारठाणा परिसरातील व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी जखमी व्यक्तीस रस्त्याच्या बाजूला करून रुग्णवाहिकेची वाट बघत होते.
जखमीस सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर यांनी केली तत्काळ मदत..!
दरम्यान त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते बालाजी शिंदे सोसकर हे आपल्या कारने छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhaji Nagar) येथून जिंतुर येथे येत असतांना त्यांना घटना निर्देशनास आली यावेळी त्यांनी आपले सहकारी सोपान धापसे,नजीर पठाण व अनिल केशवे यांच्या मदतीने संबधित युवकास गाडीत टाकून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ परिहार यांनी प्रथमोपचार केले परंतु संबधित युवकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान अपघात घडल्यानंतर घटनास्थळी चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे व पोहेकाॅ रामकिशन कोंडरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.