परभणी (Parbhani) :- बाथरुमसाठी ज्वारीच्या शेतात गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार (torture) करण्यात आला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील परभणी तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन ३ फेब्रुवारीला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने बळजबरीने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
अल्पवयीन १६ वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, पिडीता ही बाथरुम आल्याने विटभट्टीच्या शेजारी उभ्या असलेल्या ज्वारीच्या शेतात गेली होती. यावेळी आरोपी तेथे आला. त्याने पिडीतेला एकटे पाहुन हात पकडला. दोघे पळून जाऊ असे म्हणाला. यावेळी पिडीतेने घडला प्रकार मी आई, वडीलांना सांगेल असे उत्तर दिल्यावर आरोपीने बळजबरीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पिडीता जोराने ओरडली असता आरोपी तेथून पळून गेला. पिडीतेच्या तक्रारीवरुन दिनेश उघडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.