Pathari Assembly Elections: निवडणुकीच्या तोंडावर देशी-विदेशी दारुच्या चारशे बॉटल जप्त

2 days ago 2

परभणी/पाथरी (Pathari Assembly Elections) : येथील पोलिसांच्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास देवनांद्रा शिवारात गुलशन नगर येथे कारवाई करत देशी – विदेशी दारुच्या ३९८ बॉटल जप्त केल्या आहेत. या (Pathari Assembly Elections) कारवाईत एकूण ३३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार बालाजी लटपटे यांच्या तक्रारीवरुन किरण बियाणी, सय्यद रफिक, सखाराम जाधव यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी १८ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु, १० हजार ८० रुपये किंमतीची देशी दारु, साडे तीन हजाराची भिंगरी संत्रा आणि १ हजार ९५० रुपये किंमतीची ट्युबर्ग बियर जप्त केली. प्रकरणाचा तपास पोह. लोखंडे करत आहेत. (Pathari Assembly Elections) सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी करण्यात येत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article