एकच यूएएनअंतर्गत ट्रान्स्फर : सदस्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर 1 ऑक्टोबर 2017 रोजी किंवा त्यानंतर दिलेला असेल आणि तो आधार नंबरशी जोडलेला असेल, तर आणि यानुसार एकच यूएएन नंबर असलेल्या सदस्याला पीएफ खाते स्थानांतर करायचे असेल, तर त्यास नव्या नियमांचा लाभ मिळणार आहे.
विविध यूएएनदरम्यान ट्रान्स्फर (दोन्ही यूएएन 1 ऑक्टोबर 2017 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेला असेल तर) : कर्मचार्याकडे एकाच आधारशी संबंधित अनेक यूएएन जोडलेले असतील आणि सिस्टीम त्यास एकच व्यक्ती म्हणून ओळखत असेल, तर कंपनीच्या हस्तक्षेपाशिवाय सीमलेस ट्रान्स्फर करण्याची परवानगी मिळते.
एकच यूएएनअंतर्गत ट्रान्स्फर (1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केलेला यूएएन) : जुन्या यूएएनसाठी पीएफ ट्रान्स्फर करायचे असेल, तर त्यासाठी आधार जोडलेला असणे आवश्यक आहे आणि मेंबरच्या आयडीतील विवरण हे मिळतेजुळते असणे आवश्यक आहे. यात सदस्याचे नाव, जन्मतारीख आणि लिंग सारखे असणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहितीही सर्व ठिकाणी सारखी असावी.
विविध यूएएनदरम्यान ट्रान्स्फर (1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केलेले यूएएन): अनेक यूएएनमध्ये (एक जुने) पीएफ ट्रान्स्फरची परवानगी आहे; मात्र दोन्ही यूएएन एकाच आधारशी जोडलेले असतील आणि व्यक्तिगत विवरण मिळतेजुळते असेल तर.
यानुसार सर्व प्रकरणात यूएएन आधारशी जोडलेले असेल आणि वैयक्तिक माहिती मिळतीजुळती असेल, तर कंपनीच्या पडताळणीशिवाय वेगाने पीएफ ट्रान्स्फर होण्याची प्रक्रिया पार पडेल.