लग्न म्हटलं की भांडण, कुरबुरी आल्याच. छोट्या -मोठ्या मुद्यांवरून भांडण होत असतातंच, पण काहीवेळा तो वाद वाढतो आणि होत्याचं नव्हतं होतं. अनेक लोकं लग्न तर करतात पण वेगवेगळ्या कारणांमुळ ते घटस्फोटाच्या दिशेने जातात. कोणंतही नातं संपवायचं असेल तर त्याच्यामागे एखादं मोठं कारण निश्चितच असतं. पण एखाद्या चपलेमुळे किंवा सँडलमुळे घटस्फोट होत असेल तर ? एखाद्या सँडलमुळे कोणी घटस्फोट कसं मागू शकतं ? असा विचार तुमच्याही मनात आला असेल ना. पण असं झालं आहे, हे खरंच घडलं आहे. तेही प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजमहालच्या शहरातचं. हो आग्र्यामध्ये ही अजब घटना घडली आहे, जिथे केवळ एका सँडलमुळे पती-पत्नीतील वाद एवढा वाढला की ते प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचलं. या जोडप्याने अवघ्या वर्षभरापूर्वीत, 2024 साली हिंदु रिती-रिवाजांनुसार लग्न केलं खर पण आता त्यांच्या वाद एवढा वाढला आहे की ते त्यापायी ते कौटुंबिक समुपदेशन केंद्रात जाऊन पोहोचले आहेत.
हाय हिल्स सँडल ते घटस्फोट.. काय आहे प्रकरण ?
आग्रा येथे राहणाऱ्या एका जोडप्याचे 2024 मध्ये लग्न झाले. त्या जोडप्यातील महिलेला उंच टाचांच्या सँडल ( हाय हिल्स) घालण्याची आवड होती, म्हणून तिने पतीकडे हाय हिल्स असलेल्या सँडलची मागणी केली. नवऱ्याने ते सँडल्स आणूनही दिले, पण तरीही त्यांचं प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. त्यांच्यात नेमकं काय बिनसलं ? खरंतर झालं असं की, त्या इसमाची पत्नी एकदा हाय हिल्स घातल्यामुळे पडली, त्यानंतर तिला खूपच लागलं. त्यामुळे बायकोच्या काळजीपोटी नवरा हाय हिल्सच्या विरोधात होता. पण प्रत्येकाची एक आवड असते. त्या महिलेला हाय हिल्स घालण्याची एवढी आवड होती की तिची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिने पतीशी थेटं भांडण सुरू केलं. पाहता पहात हाँ वाद वाढला आणि प्रकरण थेट पोलिसांतच गेला ना राव !
या कारणामुळे वाढला वाद आणि थेट हाणामारीच
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनाही धक्का बसला. पत्नी जेव्हा जेव्हा हाय हिल्स सँडल मागायची तेव्हा त्या दोघांमध्ये वाद व्हायचे, असे समोर आले. गेल्या महिन्यात हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये भांडण झाले आणि पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. महिन्याभरापासून ती माहेरीच रहात होती. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी तो वाद कुटुंब समुपदेशन केंद्राकडे ट्रान्सफर केला. ‘ मी सतत हाय हिल्सच्या सँडलची मागणी करते, तेव्हा पती सांगतात की पगार झाल्यावर सँडल आणून देईन. गेल्या 8 महिन्यांपासून हेच सुरू आहे, पण आत्तापर्यंत त्यांनी हाय हिल्सच्या सँडल आणून दिल्या नाहीत’ असं सांगत पत्नीने तिची बाजू मांडली. आणि आता याच काराणावरून पती-पत्नी घटस्फोटाची मागणी करत आहेत.
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं असून लोकांचीही चर्चा सुरू झाली. युजर्सनी या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया दिल्या. सँडलमुळे कोणी नातं संपवतं का ?, असं एका यूजरने लिहीलं. तर दुसरा युजर म्हणाला – हे कसगळं काय पहावं लागतंय. घटस्फोट मागण्याचं हे काही कारण होऊ शकत नाही, अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे.