महाळुंगे येथे आचाऱ्याचा खून, रागाच्या भरात चाकूने हल्ला file photo
Published on
:
07 Feb 2025, 8:03 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:03 am
पिंपरी : महाळुंगे येथील खराबवाडी परिसरातील एका हॉटेलजवळ एका कामगाराने आचाऱ्याचा चाकूने वार करून खून केला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमधील आचारी आणि कामगार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर कामगाराने रागाच्या भरात चाकूने आचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. खुनामागे नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.