अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव फक्त बॉलिवूडपुरतं मर्यादित नसून हॉलिवूडमध्येही तिने तिची ओळख बनवली आहे. त्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात तिचे कोट्यवधी फॉलोअर्स, चाहते आहेत. सध्या जरी ती बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी नुकतची पीसी ही भारतात आली आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ याचा काही महिन्यांपू्र्वीच साखरपुडा झाला होता आणि आता तो विवाहबद्ध होत आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून खास त्यासाठी प्रियांका भारतात आली आहे. प्रियांकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांका ही हॉलिवूडमधे कार्यरत असी आणि सध्या अमेरिकेत रहात असील तरी ती तिच्या संस्कृतीशी अजूनही संलग्न आहे.
ती नुकतीचसिद्धार्थ चोप्राच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये जबरदस्त स्ट्रॅपलेस गाऊन घालून पोहोचली होती. यावेळी देसी गर्लचे सासू-सासरेही तिच्यासोबत दिसले. पापाराझींसमोर पोझ देतानाही प्रियांकाला सासरच्या लोकांचा विसर पडला नव्हता.त्यांनाही सोबत बोलावून तिने फोटोसाठी पोझ दिली. मात्र त्याचवेळी प्रियांकाने तिच्या सासूबाईंसाठी असं काही केलं की ते पाहून चाहते खुश झाले. तिचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत तिचं कौतुक केलंय.
सध्या प्रियांका चोप्राचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियांका जेव्हा संगीत फंक्शनसाठी पोहोचली तेव्हा तिने पापाराझींना जबरदस्त पोज दिली. यावेळी त्याच्यासोबत निक जोनासचे आई-वडीलही उपस्थित होते. या लग्नाला निक जोनास आलेला दिसला नाही, अद्याप त्याचं दर्शन झालेलं नाहीये. पण लग्नाला हजेरी लावण्यासाठी प्रियांकाचे सासरे आणि सासरे पोहोचले आहेत. प्रियांकाची सासूबाई डेनिस जोनास गुलाबी रंगाच्या साडीत दिसल्या तर केविन जोनास सिनियर हे भारतीय पोशाखात दिसले. .
सासूबाईंसाठी प्रियांकाची खास कृती
सासू-सासऱ्यांसोबत प्रियांकाने पापाराझींसाठी पोज दिली मात्र त्यापूर्वी ती तिच्या सासूची साडीही फिक्स करताना दिसली. अभिनेत्रीची ही कृत, तिची काळजी घेण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली. ती तिच्या सासरच्या लोकांशी किती चांगली वागते, असे म्हणत अनेकांनी तिची स्तुति केली. प्रियांकाच्या आउटफिटबद्दल सांगायचं झालं तर तिने या फंक्शनसाठी पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन घातला होता. तिच्या गाऊनवर फुलांचे आणि पानांचे रंगीत डिझाइन होतं.
याशिवाय तिने गळ्यात एक सुंदर नेकपीसही घातला होता. खुले केस, हातात एक ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या घालून पीसीने तिचा लूक पूर्ण केला. प्रियांकाचा हा लूक तिच्या भावाच्या संगीत फंक्शनसाठी परफेक्ट होता. प्रियांका तिच्या भावाच्या प्री-वेडिंग फंक्शनचा खूप आनंद घेत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फंक्शनचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. प्रियांका तिच्या प्रत्येक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.