संसदेत विरोधकांनी सरकारला पुन्हा नवीन मुद्द्यावरून घेरले...!Pudhari Photo
Published on
:
06 Feb 2025, 6:00 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:00 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार आहेत. दरम्यान अमेरिकेतील भारतीयांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विरोधी पक्षातील खासदारांनी आज केली. या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ वाढल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत संसदेची दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज सुरू होताच, विरोधी पक्षातील खासदारांनी पुन्हा एक नवीन मुद्दा उपस्थित केला. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. या कारणाने राज्यसभा देखील दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Lok Sabha adjourned till 12 noon amid ruckus following Opposition MPs' demand to discuss the issue of deportation of Indian nationals who were allegedly illegally living in the US. pic.twitter.com/UTPMln1Mzp
— ANI (@ANI) February 6, 2025Rajya Sabha adjourned till 12 noon amid ruckus following Opposition MPs' demand to discuss the issue of deportation of Indian nationals who were allegedly illegally living in the US. pic.twitter.com/keIX8pMOqG
— ANI (@ANI) February 6, 2025