Published on
:
06 Feb 2025, 9:17 am
Updated on
:
06 Feb 2025, 9:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर क्रूर हल्ला करुन युद्धाला सुरुवात करणार्या हमास दहशतवादी संघटना मागील वर्षाभरात जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या संघटनेत समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांसह ओलिस ठेवलेल्या पुरुष इस्रायली नागरिकांवर बलात्कार करणार्या सैनिकास फाशीची शिक्षा ठाेठावली, अशी धक्कादायक माहिती हमासच्या गोपनीय कागदपत्रांवरून उघड झाली आहे.
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हमासकडे संघटनेत सहभागी असलेल्या समलैंगिक पुरुषांची यादी होती. २०१२ ते २०१९ या कालावधीत अशा प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यात हमासचे एकूण ९४ सैनिक सहभागी होते. या सर्वांवर समलैंगिक संबंध ठेवणे, मुलींशी छेडछाड करणे, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणे आणि मुलांवर अत्याचार करणे यासारखे गंभीर आरोप आहेत. गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते.या संघटनेत समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांसह ओलिस ठेवलेल्या पुरुष इस्रायली नागरिकांवर बलात्कार केलेल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याचे गोपनीय कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
२०१६ मध्ये समलैंगिक संबंध ठेवल्याबद्दल हमासचा माजी कमांडर महमूद इश्तावी याला फाशी देण्यात आली होती. हमासने त्याला तुरुंगात टाकल्यानंतर एक वर्षानंतर त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, असेही अहवालात म्हटले आहे.