खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानामध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक Pudhari File Photo
Published on
:
06 Feb 2025, 9:08 am
Updated on
:
06 Feb 2025, 9:08 am
जळगाव |येथील गोयल ज्वेलर्स मध्ये सोने चांदी खरेदीच्या बाहण्याने दुकानात घुसून दोन बुरखा धारी महिलांनी दुकानदार व त्यांचे नोकर यांचे लक्ष विचलित करून वीस ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या बुरखाधारी महिलांना मालेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून संपूर्ण चोरीच्या मालाची रिकव्हरी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बालाजी पेठ, सराफ बाजार येथील विश्वनाथ हनुमानदासजी अग्रवाल वय 69 वर्षे यांचे मालकीचे गोयल ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे बहान्याने प्रवेश करुन त्यातील एका महिलेने दुकानात असलेल्या दुकान मालक विश्वनाथ अग्रवाल व त्यांचे नोकराचे लक्ष विचलीत करुन दुसऱ्या महिलेने दुकानातील काउंटर मधून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. दुकानात असलेल्या CCTV कॅमेराचे फुटेज तसेच पोलीस विभागाचे अधिनस्त असलेले नेत्रम कॅमेरांचे फुटेज तपासणी केली असता सदर चोरी करणाऱ्या महिला या फिर्यादी यांचे दुकानातून चोरी करून जळगाव शहरातील सुभाष चौक, घानेकर चौक असे पायी-पायी चालत येवून काट्या फाईलचे दिशेने येतांना दिसून आल्या. त्यानंतर पुढे खाजगी दुकानांस बसविलेले CCTV कॅमेराचे फुटेज तपासणी केली असता सदर महिला या बळिराम पेठ मध्ये उभ्या असलेल्या वाहनात बसुन जात असल्याने सदर वाहनाचा शोध घेतला असता नेत्रम कॅमेराचे फुटेज मध्ये सदर वाहन क्र. MH 14 DF 5703 अशी निष्पन्न झाली. निष्पन्न वाहन हे धुळे दिशेने जात असल्याने पारोळा टोलनाका येथे सदर वाहनाचे फासटेंग डिटेल मिळवून त्यावरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून वाहन चालक आसिफ मो. रफिक अहमद अन्सारी वय २२ वर्षे हा . 28 जानेवारी २०२५ रोजी संशयित आरोपी महिला सईदा रहेमतुल्ला अन्सारी वय 41 वर्षे व इरफाना बानो आल्लाह बक्ष शेख वय 44 वर्षे रा. मालेगाव जि. नाशिक, यांना भाड्याने मालेगाव येथून जळगाव येथे घेवून आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर महिलांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात येवून त्यांचेकडून खालील प्रमाणे गुन्ह्यात चोरीस गेलेला 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदर दोन्ही महिलांस विचारपूस करता त्यांनी कळविले की, . 28 जानेवारी 2025 रोजी सदर दोन्ही महिला या त्यांचेवर फैजपुर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्याची यावल कोर्टत तारखेस हजर राहून कोर्ट कामकाज झाल्यानंतर जळगाव येथून परत जात असताना चोरी केल्याचे सांगितले आहे.
सदर महिलांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली असता त्यांचेवर जळगाव व इतर जिल्ह्यांत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. मालेगाव पोलीस स्टेशन, कोल्हापूर गेट साक्री ता धुळे, चिखली पिंपळनेर या ठिकाणी गुन्हे दाखल आहे
सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेडी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रंगनाथ धारबळे तसेच एपिआय साजिद मंसूरी, पि एस आय योगेश ढिकले, विजय खैरे, किरण वानखेडे, निलेश घुगे, काजल. सोनवणे, तसेच नेत्रम विभागातील पोकॉमुबारक देशमुख यांनी अशांनी केली आहे.