Published on
:
06 Feb 2025, 5:54 am
Updated on
:
06 Feb 2025, 5:54 am
भिवंडी : तालुक्यातील दापोडा येथील कंपनी मालक व्यापाऱ्याने सौदी अरेबिया देशातील ग्राहकासाठी जहाजातून कपड्याचा माल पाठवला असता तो माल हलक्या दर्जाचा असल्याचे ग्राहकाने गोदाम मालकाच्या वडिलांना फोनद्वारे कळवताच व्यापाऱ्याने कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
गौतम हेलीवाल ऊर्फ अगरवाल (३२) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष विजय जैन (२१) हे मुंबईतील भायखळ्यात निर्मल पार्क जवळील एका इमारतीत राहत असून त्यांची भिवंडीतील दापोडा येथील मनीष कंपाऊंडमध्ये फॅब्रिक एक्स्पोर्ट करणारी कंपनी आहे.
त्यांनी ७ ते ३० जानेवारी रोजी दरम्यान एच.एम. बाय एच. एम. क्वॉलीटीचा फॅब्रिक माल सौदी अरेबियातील एका ग्राहकास जहाजातून निर्यातीसाठी पाठवला असता सदर माल ३० जानेवारी रोजी ग्राहकास मिळाला. परंतु ग्राहकाने माल हलक्या दर्जाचा असल्याचे आयुषच्या वडिलांना फोनद्वारे सांगितल्याने कंपनीत २ लाख ५ हजार रुपये किमतीचा क्वालीटीचा माल तपासला असता तो माल सापडला नाही. अपहार प्रकरणी गौतमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.