देशी जुगाड करण्यात आपल्या भारतीयांची कोणी बरोबरी करू शकत नाही. अनेकजण असे काही ट्रिक्स वापरतात ज्यामुळे लोकं आश्चर्यचकित होतात. तसं पहिले तर हे देशी जुगाड एक प्रकारचे सोपे हॅक आहेत. ज्यामुळे आपलं काम वेळेत आणि लवकर होते. दरम्यान असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये घर काम करणाऱ्या बाईने अगदी सहजपणे काही ट्रिक्स वापरून भांडी कशी चमकवू शकतो हे सांगितले आहे. ज्याचा फायदा अनेक गृहिणींना होऊ शकतो.
स्वयंपाकघरातील काम जितकं सोपं वाटतं तितके सोपे नसते. स्वयंपाक करण्यापासून ते भांडी साफ करण्यापर्यंत महिला त्यांचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात घालवतात. स्वयंपाकघरातील इतर भांडी साफ करणे फारसे अवघड नसले तरी दररोज वापरला जाणारा काळा तवा साफ करणे आव्हानात्मक असतो. खरं तर काही महिला या तवा चकचकीत करण्याच्या भानगडीतच पडत नाही. यामुळे तवा व्यवस्थित साफ करता येत नाहीत.
हे सुद्धा वाचा
मात्र या काही दिवसांमध्ये असाच एक हॅकचा व्हिडिओ समोर आला आहे, हे हॅक तुम्ही अंगीकारला तर तुमच्या स्वयंपाकघरातील कढई आणि इतर भांडी चमकतील. नेमकी काय आहे हा देशी जुगाड जो भन्नाट व्हायरल होत आहे चला जाणून घेऊयात.
या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की यात घर काम करणारी बाई काळाशार तवा एकदम झटपट पद्धतीने साफ करते. पण तुम्ही तवा साफ करण्याची ट्रिक पाहिली का? यासाठी ती बाई सर्वात पहिले काळा पडलेला तवा गॅसवर ठेवते आणि त्यात थोडसं पाणी टाकते. त्यानंतर पाणी गरम झाल्यावर त्या तव्यावर तुरटीचा तुकडा घेऊन घासते. त्यानंतर तेच तुरटीचं पाणी एका भांड्यात काढून तवा चांगला घासून काढते. त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे काळाशार तवा एकदम क्षणार्धात चमकदार दिसतो.
हा व्हिडिओ @2414garima इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक यूजर्सने कंमेंट्स केलेल्या आहेत. अशातच एका युजरने लिहिलं, ‘वाह! ही ट्रिक आश्चर्यकारक आहे आणि ही ट्रिक खरोखर काम करते.’ आणखी एकाने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले आहे की, ”आमच्या येथे महिला तवा साफ करण्यासाठी राखेचा वापर करतात आणि यापेक्षा भांडी आणखी चमकतात.” आणखी एका यूजर्सने लिहिले की, ”शहरातील लोकांना हे आश्चर्यकारक वाटतं असेल पण हे खेड्यापाड्यात अगदी सामान्य आहे, भाऊ!” याशिवाय अनेक युजर्सने त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.