परराष्ट्र मंत्री जयशंकर. दुसर्या छायाचित्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प. file photo
Published on
:
06 Feb 2025, 10:40 am
Updated on
:
06 Feb 2025, 10:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत आणणे हे सर्व देशांचे कर्तव्य आहे. एखाद्या देशातून स्थलांतरितांच्या हद्दपारीची प्रक्रिया नवीन नाही. ती अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य असणार्या भारतीय स्थलांतरितांबरोबर कोणतेही गैरवर्तन होऊ नये, असे आवाहन ट्रम्प सरकारला करण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आज (दि. ६) राज्यसभेत दिली.
अमेरिकेतून भारतात पतरलेल्या १०४ नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी
अमेरिकेतील स्थलांतरित भारतीयांच्या मुद्यावर काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, "अमेरिकेतून बुधवारी (दि. ५) भारतात १०४ लोक परतले आहेत. आम्ही त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी केली आहे. अशा प्रकारचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यांचे नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले तर त्यांना परत आणणे हे सर्व देशांचे कर्तव्य आहे. हद्दपारीची प्रक्रिया नवीन नाही."
अमेरिकेने आतापर्यंत परत पाठवलेल्या भारतीयांची आकडेवारीही सादर
जयशंकर यांनी अमेरिकेतून आतापर्यंत भारतात पाठवण्यात आलेल्या लोकांची आकडेवारीही सभागृहासमोर सादर केली. त्यांनी सांगितले की, २००९ मध्ये ७३४, २०१० मध्ये ७९९, २०११ मध्ये ५९७ आणि २०१२ मध्ये ५३० भारतीयांना परत पाठवण्यात आले होते. यावेळी त्यांनी २०२४पर्यंतची आकडेवारीच सादर केली.
बेकायदेशीर स्थलांतर केलेल्याची होणार सखोल चौकशी
आपल्या देशातून बेकायदेशीर स्थलांतर करणार्या रॅकेटवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणारे मायदेशी परतल्यानंतर त्यांची सखोल चौकशी होणार आहे. ते अमेरिकेत कसे गेले?, एजंट कोण होता? असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून आपण कशी खबरदारी घेता येईल, याबाबचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थलांतरितांच्या हद्दपारीवरुन दोन्ही सभागृहात गदारोळ
विमानतळावर उतरले. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांची पाठवून सूरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापक चर्चेसाठी वॉशिंग्टन दौऱ्याच्या काही दिवस आधी ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असणार्या भारतीयांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आक्रमक झाले. यामुळे सभागृहांमध्ये गदारोळ झाला होता.