Published on
:
06 Feb 2025, 10:34 am
Updated on
:
06 Feb 2025, 10:34 am
उल्हासनगर: पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा फिरत असल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन्ही रिक्षा वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प 3 फॉर्वर लाईन परिसरात वाहतूक पोलिसांना (MH 05 CG 7082) या क्रमांकाची रिक्षा संशयित वाटल्याने त्यांनी ही रिक्षाला थांबवले. तेव्हाच सारखीच नंबर प्लेट असलेली आणखीन एक रिक्षा तेथे आली. तेव्हा पोलिसांनी या दोन्ही रिक्षांना ताब्यात घेतले आणि दोघांचेही कागदपत्र तपासण्यासाठी घेतले. तपासणीत डोंबिवलीत राहणारे रवींद्र पाटील यांच्याकडील कागदपत्र हे ओरिजनल असून सुनील पाटील यांच्याकडील कागदपत्रे खोटे असल्याचे वाहतूक विभागाला समजले.
सुनील याने कारवाईच्या भीतीने मागील सहा महिन्यांपासून फेक नंबर वापरून रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे रिक्षाला लावलेल्या खोट्या नंबरप्लेट मुळे मालकाला 4500 रुपयांचा दंड देखील भरावा लागला होता. वाहतूक पोलिसांनी दोन्ही रिक्षांना ताब्यात घेतले आहे. सदर खोट्या नंबरप्लेट वापरणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई करणाऱ्यात आली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी दिली आहे.