ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे बारीक नजर असते. कोणता ग्रह कोणत्या स्थिती आणि काय फळ देणार यावरून भाकीत वर्तवलं जातं. जन्मावेळी असलेली ग्रहांची स्थिती आणि सध्याच्या गोचर कुंडलीनुसार व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे गोचर कुंडलीत एखादी मोठी घडामोड घडली की त्याचा परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. फेब्रुवारी महिन्यात ग्रहांची अशी स्थिती तयार होणार आहे. कुंभ संक्रांत म्हणजेच सूर्य देव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. या राशीत शनिदेव गेल्या दोन वर्षांपासून ठाण मांडून आहेत. या राशीवर शनिचं स्वामित्व आहे. त्यामुळे सूर्य-शनि हे पितापूत्र एकत्र येणार असल्याने बऱ्याच घडामोडी घडणार आहे. त्यात या दोघांचं एकमेकांशी पटत नसल्याने या दोघांचं एकत्र येणं प्रभाव पाडणारं ठरेल. त्यात बुध ग्रहही याच राशीत असणार आहे. त्यामुळे 30 वर्षानंतर कुंभ राशीत हे तीन ग्रह एकत्र येणार आहेत. कारण शनि देवांना एका राशीत परतण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे कुंभ राशीतील ही युती आता थेट 30 वर्षानंतर होऊ शकते. या स्थितीचा तीन राशींना लाभ मिळू शकतो.
या राशींना मिळणार लाभ
मेष : कुंभ राशीतील त्रिग्रही युती या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना या युतीचा लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. तसेच कामाच्या ठिकाणी मोठं पद मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना या कालावधीत नोकरी मिळू शकते. गेल्या काही दिवसात केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच वडीलांची तु्म्हाला काही कामांमध्ये साथ मिळेल.
मिथुन : या राशीच्या नवव्या स्थानात त्रिग्रही युती होत आहे. यामुळे जातकांना नशिबाची उत्तम साथ लाभेल. काही गोष्टी थोड्याशा मेहनतीने मिळतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. या कालावधीत अडकलेली कामं मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. गेल्या काही दिवसांपासून मनावर असलेलं दडपण दूर होईल. आर्थिक गणित जुळून येईल त्यामुळे काही प्रश्न मार्गी लागतील.
धनु : या राशीच्या तिसऱ्या स्थानात तीन ग्रह एकत्र येत आहेत. यामुळे काही धाडसी निर्णय या कालावधीत घेण्याची शक्यता आहे. नोकरी आणि उद्योगधंद्यात तुमच्या निर्णयाचा फायदा होईल. व्यवसायात तुम्ही घेतलेला निर्णय पथ्यावर पडू शकतो. यामुळे आर्थिक कोंडी फुटू शकते. नवा व्यवसाय सुरु करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांनी हा योग्य कालावधी आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)