'चांद्रयान-४ २०२७ मध्ये तर...'; मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली महत्त्वाची अपडेटप्रातिनिधिक छायाचित्र
Published on
:
06 Feb 2025, 8:24 am
Updated on
:
06 Feb 2025, 8:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून आगामी काळात अनेक महत्त्वाच्या मोहीमा प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या मोहिमांसदर्भात अपडेट आज (दि.६) दिली आहे. PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय अंतराळ संस्थेच्या मोहिमांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत २०२७ मध्ये चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी 'चांद्रयान-४' मोहीम प्रक्षेपित करेल. चांद्रयान-४ मध्ये हेवीलिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचे किमान दोन वेगवेगळे प्रक्षेपण केले जातील जे मोहिमेचे पाच वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील, असेही मंत्री सिंह यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, २०२६ मध्ये भारत खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी 'समुद्रयान' मोहिम देखील प्रक्षेपित करेल आणि 'गगनयान' ही मोहीम देखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल, असेही मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.
"चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. यामध्ये हेवी-लिफ्ट LVM-३ रॉकेटचे किमान दोन वेगवेगळे प्रक्षेपण समाविष्ट असतील जे मोहिमेचे पाच वेगवेगळे घटक वाहून नेतील जे कक्षेत एकत्र केले जातील," असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी (दि.६) सांगितले. पुढे त्यांनी "गगनयान मोहीमेत भारतीय अंतराळवीरांनी विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे, पुढील वर्षी ही प्रक्रिया सुरू केली जाईल', असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०२६ मध्ये, भारत समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल, ज्यामध्ये तीन शास्त्रज्ञांना खोल समुद्रात ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी नेले जाईल. "ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या इतर महत्त्वाच्या मोहिमांच्या वेळेनुसार होईल, जी देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग ठरेल," असे सिंह म्हणाले.