प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्व असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. तसेच लाल रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाइन्स डे आता जवळ आलाय. विशेषतः लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. त्या दिवशी लाल रंगाच्या गुलाबांना प्रचंड मागणी असते. व्हॅलेंटाईन वीकमध्ये बहुतांश प्रेमी युगुल आणि कपल्स आपल्या पार्टनरला गुलाबाचे लाल फुल आणि भेटवस्तू देतात. या व्हॅलेंटाइन्स डे आठवड्याची सुरुवात रोज डेपासून होते, अशातच कपल्स आपल्या जोडीदाराला गुलाब देतात. त्याचप्रमाणे प्रेमाची कबुली देताना सुद्धा प्रेमी युगुल आपल्या पार्टनरला गुलाब देतात. पण असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेलच, तो म्हणजे प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचे फुलंच का देतात?
आपल्याकडील विविध प्रकारची फुलं अशी आहेत ज्यांचे सौंदर्य मनाला भुरळ घालणारे आहे. तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब का दिला जातो? अखेर ही परंपरा कुठून आणि कधी सुरू झाली? चला जाणून घेऊया.
काय आहे प्रेमळ कथा?
लाल गुलाब हे सन्मान, प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते. प्रेम व्यक्त करताना अनेक कपल्स एकमेकांना लाल गुलाब देतात. यामागे अनेक कथा सांगितल्या जात असतात. असे म्हटले जाते की मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाबाची फुलं खूप आवड होती. त्यामुळे नूरजहाँ बेगमला खूश करण्यासाठी मुघल बादशहा जहांगीर त्यांना रोज एक ताजे गुलाब देत असे. तर दुसरीकडे राणी व्हिक्टोरिया यांनी आपले प्रेम व्यक्त करताना पती प्रिन्स अल्बर्ट यांना गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट दिला. तसेच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच दिवशी रोज डे साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्हॅलेंटाइन्स डे ला प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाब देण्यात येतं.
हे सुद्धा वाचा
लाल गुलाबात एवढं काय खास आहे ?
लाल गुलाब प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा लाल रंग, जो ऊर्जा, आकर्षण आणि खोल प्रेमाचे प्रतीक आहे. लाल गुलाब केवळ एकदाच नाही, तर कधीही प्रेम व्यक्त करताना दिला जातो. कायम लाल गुलाब दिल्यामुळे प्रेम वाढतं आणि नातं मजबूत होतं, असं म्हणतात. मात्र लाल गुलाबाचं फूल तुमच्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो. हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं. जसं मैत्री दर्शवण्यासाठी पिवळ्या गुलाबाचं फूल देतात, तसंच प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देतात. लाल रंगामध्येही विविधता असते हे फूल तुमच्या मनातील भावना शब्दांशिवाय व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. अशा तऱ्हेने व्हॅलेंटाईन वीकदरम्यान प्रेमी युगुल रोज डेला आपल्या पार्टनरला लाल गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.