दुचाकीला भरधाव टँकरने समोरून धडक दिल्याने अपघात झाला. File Photo
Published on
:
04 Feb 2025, 4:21 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:21 am
खालापूर, खोपोली : सावरोली-खारपाडा मार्गावर रविवारी संध्याकाळी दुचाकीला भरधाव टँकरने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्री ऊर्फ हार्दिक (वय ४) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील संतोष पारठे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष हा मुलाचे केस कापून त्याला आपल्या दुचाकीवरुन खरसुंडी गावातून खालापूरच्या दिशेने निघाला होता. चार वाजण्याच्या सुमारास कुंभिवली गावचे हददीत कुंभिवली पुलावर ते आले असता सावरोली बाजूकडून आलेला टँकरवरील चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला ठोकर मारून अपघात केला. यामध्ये श्री ऊर्फ हार्दिक आणि संतोष पारठे हे गंभीर जखमी झाले. त्यात हार्दिक हा जागीच मयत झाला. तर गंभीर जखमी संतोषवर एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे उपचार सुरू आहेत. टँकरचालक अपघाताची खबर न देता पळून गेला आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे टैंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अमित सावंत हे करीत आहेत.
खरसुंडी हा रस्ता अपघातांचे केंद्र बिंदु बनले असून या ठिकाणी अनेक अपघात झाले. काहींना आपले प्राण गमवावे लागत आहे. सहा महिन्यापुर्वी असाच अपघात झाल्यामुळे माडप येथील व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. लोधीवली येथे वास्तव्ये करीत असलेल समीर पार्ट हा माडप येथे एका व्यवसायिकाकडे ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. रविवारी सुट्टी असल्यामुळे मुलाचे केस कापण्यांसाठी खरसुंडी येथे आले असतांना ही दुर्घटना घडली. या घटनेने लोधीवली परिसरात शोककळा पसरली.