शनि देवाचा कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे.23 फेब्रुवारी रोजी कर्मफळ दाता शनि देव आपली स्व राशी असलेल्या कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहेत. या कालावधीमध्ये शनि देव आपल्या कमजोर अवस्थेमध्ये असतील. शनि देवांचा समावेश हा शक्तिशाली ग्रहांमध्ये केला जातो. शनि देव जर प्रसन्न झाले तर ते आपल्या भक्ताला रंकाचा राजा बनवतात. शनि देवाचा हा अस्त अनेक राशींसाठी शुभ फळ देणारा ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा पण एखाद्या ग्रहाचा अस्त होतो तेव्हा ती त्याची सर्वात कमजोर अवस्था असते. मात्र शनिचा हा अस्त मार्चपर्यंत चार राशींना अत्यंत शुभ फळ देणार आहे. मालामाल करणार आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.
वृषभ रास : शनिच्या अस्ताचा वृषभ राशीवर अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. वृषभ राशीचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी प्रचंड मान-सन्मान मिळणार आहे.धन प्राप्तीचा योग बनत आहे.व्यापाऱ्यांना देखील विशेष फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमचा जो अनावश्यक खर्च सुरू आहे, त्याला देखील या काळात लगाम लागण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रमोशनचा योग बनत आहे.
मकर रास : शनिच्या अस्ताचा मकर राशीवर देखील खूप शुभ परिणाम होणार आहे. मकर राशींच्या जातकांचं नशीब चमकणार आहे. नोकरदार वर्गाला मोठं यश मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मोठी संधी घर चालत येण्याची शक्यता आहे.नोकरीमध्ये एखादं जबाबदारीचं काम तुमच्यावर सोपवलं जाऊ शकतं. व्यापारी वर्गाला देखील मार्च महिना शुभ राहणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
धनु रास : शनि देवाचा अस्त धनु राशीच्या पथ्यावर पडणार आहे, अत्यंत शुभ योग बनत आहे. या काळात धनु राशींच्या जातकाला लाभच लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही संपत्ती संदर्भात काही मोठे निर्णय घेऊ शकता. कौटुंबीक सुखामध्ये वृद्धी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मीन रास : मीन रास मीन राशीसाठी देखील हा काळ अंत्यत शुभ असणार आहे. नोकरदार वर्गाला प्रगतीचे योग आहेत. तसेच व्यवसायात देखील मोठा फायदा होणार आहे.