Published on
:
06 Feb 2025, 4:47 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:47 am
मोखाडा : विक्रमगड तालुक्यातील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय अशा अनेक कार्यालयांची जागे अभावी घुसमट होत असल्याने या कार्यालयांचे नूतनीकरण व्हावे, प्रशस्त जागेवर इमारती व्हाव्यात यासाठी माजी आमदार सुनील भुसारा यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याभागाचा दौरा करून जलसंपदा विभागाची जागा या कार्यालयासाठी देण्याची घोषणादेखील केली होती. या प्रयत्नांना आता यश आले आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी पालघर यांनी सदरची जागा कार्यालयासाठी प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिल्याचा आदेश काढण्यात आला असून यामुळे आता विक्रमगड तहसील कार्यालयाच्या तसेच अन्य कार्यालयाच्या जागेचा प्रश्न मिटला असून लवकरच भव्य दिव्य कार्यालय जवळील उभे राहील अशी अपेक्षाव्यक्त होत आहे.
माजी आमदार भुसारा यांनी २०१९ नंतर लागलीच या जागेसाठी पाठपुरावा केला होताच त्याशिवाय सरकार मधिल आमदार असल्याने त्यांची मागण देखील तेंव्हा मान्य करून तत्कालीन मंत्री पाटील यांनी या प्रस्तावास मान्यता देवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार तहसीलदार विक्रमगड यांनी एकूण क्षेत्र ४.५८.० पैकी क्षेत्र २.००.०हे. आर. इतकी जागा प्रशासकीय इमारतसाठी मिळावी अशी २ ऑगस्ट २०१९मध्ये करण्यात आली होती.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी वाडा यांनी पुढील पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आता सदरची जागा मूल्यरीहत अशी प्रदान करण्यासंदर्भात शासनाने जिल्हाधिकारी यांना मान्यता दिल्याने जिल्हाधिकारी यांनी तसे तहसीलदार विक्रमगड यांना कळविले आहे. आता याबाबत शासकीय स्तरावरील एकूण १३ अटींची पूर्तता करून सदरचे काम प्रास्तावित करावे लागणार आहे. यामुळे आता विक्रमगडच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या मार्ग आता मोकळा झाला असून लवकरच काही वर्षांतच ही इमारत होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
वेळोवेळी आपल्या भाषणातून या कार्यालयासंदर्भात उल्लेख करून तसेच वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने माजी आमदार भुसारा यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयासह महसूल विभागाचे कार्यालय झाल्याने विक्रमगड वासियांना दिलासा मिळेल.
माझ्या कार्यकाळात जव्हार येथे नवीन तहसील कार्यालय झाले, मोखाडा झाले, विक्रमगडसाठी जागेची मोठी अडचण होती मात्र तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात तेंव्हाच घोषणा केली होती मात्र त्यानंतर सरकार बदलल्याने यांची गती मंदावली होती मात्र उशीरा का होईना मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले याचे समाधान आहे.
- सुनिल भुसारा, माजी आमदार, विक्रमगड विधानसभा