Sheikh Hasina | जमावाने शेख हसीना यांच्या वडिलांचे घर जाळले, हसिना भावूक म्हणाल्या...File Photo
Published on
:
06 Feb 2025, 7:45 am
Updated on
:
06 Feb 2025, 7:45 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: Sheikh Hasina | बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन भाषणानंतर, ढाक्यातील दंगलखोरांनी शेख मुजीबुर हमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. या हिंसक घटनेवर शेख हसीना यांनी भावूक होऊन प्रतिक्रिया दिली आहे.
मी असे काय केले आहे की, तुम्हाला इतका राग येतोय?; शेख हसीना
शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर हमान यांचे निवासस्थान हिंसक जमावाने पेटवले. या घटनेनंतर त्या भाऊक झाल्या. म्हणाल्या, "हा इतका विध्वंस का ?, मी लोकांना विचारते, मी असे काय केले की तुम्हाला इतका राग येतोय? तुम्हाला एका घराची इतकी भीती का वाटते? जर तुम्ही तुमचा इतिहास विसरलात, तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही".
हसीना यांच्याकडून तरूणांना इतिहास आठवण्याचे आवाहन
डेली स्टारच्या वृत्तानुसार, इमारत पाडण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि एक उत्खनन यंत्र सक्रियपणे इमारत पाडत आहे. बुधवारी संध्याकाळी ७:३० वाजता धनमोंडी ३२ येथे फेसबुकने आयोजित केलेल्या "बुलडोझर मार्च" या कार्यक्रमानंतर हा निषेध सुरू झाला. रात्री ९:३० वाजेपर्यंत इमारत आगीत जळून खाक झाली. बुधवारी रात्री ९ ते १० दरम्यानच्या भाषणात, हसीना यांनी येथील तरुणांना "इतिहास लक्षात ठेवण्याचे" महत्त्व पटवून दिले.
बंगबंधूंच्या संघर्षामुळे बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त
“देशाच्या संविधानावर आणि ध्वजावर हल्ला करणाऱ्यांना कदाचित पाकिस्तानपासून मिळालेले स्वातंत्र्य आवडत नसेल. त्यांनी पाकिस्तानच्या वसाहतीत राहणे पसंत केले असते,” असे हसीना म्हणाल्या. पुढे त्या म्हणाले, “बंगबंधूंच्या संघर्षामुळे हा देश पाकिस्तानपासून मुक्त झाला. जर आपण आजही पाकिस्तानात असतो तर आपल्याला भाषेचा किंवा नोकऱ्यांचा अधिकार नसता. आपण सर्वजण बेरोजगार असू. आजपर्यंत पाकिस्तानात एकही बंगाली जनरल नाही. तुम्ही कधी ऐकले आहे का?", असेही शेख हसीना त्यांच्या भाषणात म्हणाल्या.
अवामी लीगचा पायउता, इमारतीवर हल्ले सुरूच
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या या संग्रहालयावर संध्याकाळी उशिरा हल्ला झाला. हल्ल्याच्या अगदी आधी, स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन (एसएडी) चे संयोजक हसनत अब्दुल्ला यांनी त्यांच्या सत्यापित फेसबुक पेजवर घोषणा केली होती की, "बुधवार रात्रीपर्यंत, बांगलादेश फॅसिस्ट बालेकिल्ल्यातून मुक्त होईल." तणावात भर घालण्यासाठी, स्थानिक सरकारी अधिकारी आणि युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद साजीब भुईयान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "उत्सव चालू राहू द्या. "ऑगस्टमध्ये अवामी लीग सरकार सत्तेवरून बाहेर पडल्यानंतर जमावाने या घरावर हल्ला करून आग लावली होती आणि तेव्हापासून ही इमारत पडक्या अवस्थेत पडून होती.