गोरक्षकांना मारण्याची धमकी pudhari
Published on
:
06 Feb 2025, 7:41 am
Updated on
:
06 Feb 2025, 7:41 am
खालापूरः गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडत असल्याच्या रागातून गोरक्षक अनिरुद्ध संतोष डोके वय १९ व विनोद बारगजे दोघे रा. लौजी खोपोली यांना धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना खालापुरात घडली आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते, गोरक्षक खालापूर पोलीस ठाणे परिसरात जमा झाले होते.
बुधवारी अनिरुद्ध आणि विनोद दुचाकीवरून खोपोली - पेण मार्गावर प्रवास करीत असताना शिरवली गावाच्या हद्दीत टेम्पोजवळ गर्दी दिसल्याने थांबले होते. टेम्पोत बैल असल्याचे पाहून चौकशी करत असताना त्या ठिकाणी असलेले काहीजण अंगावर धावून आले. गोरक्षकानी मंगळवारी पिकअप गाडी पकडून दिल्याचा राग मनात धरून तीन ते चार जणांनी अनिरुद्ध आणि विनोदला धक्काबुक्की केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बैल वाहक टेम्पो सह सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गोरक्षकांना धक्काबुक्की झाल्याचे समजतात परिसरातील बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते.