मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला त्याचा विजय मिळाला. मी गेल्या तीन वर्षंपासून एकटी लढत आहे, माझ्याकडे पैसेही नव्हते, मी माझे सगळे दागिने विकून टाकले आणि लढत्ये, गाडी विकली. घर भाडे मी सात महिन्यापासून भरलं नाही. एकटी लढा देत आहे, अशा शब्दांत करूणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. फॅमिली कोर्टाने त्यांचा दावा मान्य केल्यानंतर आज करूणा शर्मा यांना यश मिळालं आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलं.
कोर्टाच्या या निकालानंतर तरूणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत त्यांची बाजू मांडली, प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या करूणा शर्मा ?
इतक्या वर्षांपासून हा लढा सुरू आहे, अखेर मला आता त्यात यश आलं आहे. पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिली आहे. मी त्यांची बायको नाही, पोटगी देऊ नका असे सांगत त्यांचे ( धनंजय) वकील लढत होते, पण आजा कोर्टाने मला पहिली पत्नी म्हणून ऑर्डर दिली, मला न्याय दिला आहे,असं करूणा शर्मा म्हणाल्या.
1996 पासून आम्ही सोबत आहोत, आजपर्यंत माझ्यावर जो हिंसाचार झाला त्याची केस होती. हिंसाचार करू नका, असं कोर्टाने आदेश दिले. मला कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली, माझी गाडी फोडली. पोलीस माझ्या घराखाली राहायची. मला भीती होती म्हणून मुंबई सोडली. पोलीस कधीही येईल आणि मला उचलून नेतील अशी मला भीती होती. म्हणून मी मुंबई सोडली आणि बीडमध्ये राहते. आता मी बीडमध्ये सेफ आहे. मी आठवड्याला मुंबईत येत असते.
मुलाबाळांना याची किंमत चुकवावी लागते
हा लढा माझा सुरू आहे. पण मुलाबाळांना या प्रकरणाची किंमत चुकवावी लागत आहे. माझ्या नवऱ्याला ते समजत नाही. माझी तिसरी मुलगी आहे. तुझा बाप काय करतोय हे तिला विचारणार नाही. पण मला तुरुंगात टाकलं तेव्हापासून आजपर्यंत माझा मुलगा आणि मुलगी शाळेत गेले नाहीत. धनंजय मुंडेंची बायको होण्याची किती मोठी किंमत चुकवावी लागली आम्हाला अशा शब्दांत त्यांनी त्यांची व्यथा मांडली.
तुमच्यासाठी मी करुणा शर्मा आहे. पण माझ्यासाठी मी करुणा धनंजय मुंडे आहे,असं त्यांनी नमूद केलं. माझं ते प्रेम होतं. लग्न कोणीही करतं. पण प्रेम होणं ही मोठी गोष्ट आहे. 16 व्या वर्षापासून 45वर्षापर्यंत कोणी कोणासोबत असं राहत नाही. प्रेम होते म्हणून तर राहिले ना. दोन मुलं झाली, असंही त्या म्हणाल्या.
माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात
मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. जेव्हा हे विचार येतात तेव्हा माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ती आत्महत्या करून मेली. तिने आमचा विचार केला नाही, असे सांगताना आईच्या आठवणीने भावूक झालेल्या करूणा शर्मांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
पहिली बायको म्हणून मला ऑर्डर दिली आहे. बायको नसल्याने पोटगी देऊ नये असं त्यांच्या वकिलाचं म्हणणं होतं. पण कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली आहे. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. मला 15 लाख रुपये पोटगी हवी आहे. घराचं भाडं 1 लाख 70 हजार आहे. हे भाडं भरलं जात नाही. मेंटेनन्स ३० हजार दर महिना आहे. मुलगा बेरोजगार घरात आहे. दोन लाखात काय होणार,सा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी रखेल असते तर 50 कोटी रुपयांचे कन्स्ट्रम हायकोर्टात फाईल केलेलं आहे. हवंतर मी त्याची कॉपी देईन. मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे, असा पुनरुच्चार करूणा शर्मा यांनी केला.