Karuna Sharma Big Allegation connected Walmik Karad : पोटगी प्रकरणात न्यायालयाचा निकाल करुणा शर्मा यांच्या पारड्यात पडला. त्यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे धनंजय मुंडे यांना आदेश देण्यात आले. तर करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केला आहे.
वाल्मिक कराड, करुणा शर्मा, धनंजय मुंडे
बीडमधील बाप आपणच, असे सांगणाऱ्या वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात गेला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तपासात, खंडणीत त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. तर पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत त्याचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे. आज करुणा शर्मा यांनी वाल्मिकवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते, असा दावा सुद्धा त्यांनी केला.
बातमी अपडेट होत आहे…