पत्नीचा खून करणाऱ्या पतीला गोदाघाटावरून अटकFiIle Photo
Published on
:
06 Feb 2025, 4:53 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:53 am
नाशिक : कौटुंबिक कारणातून पत्नीचा खून करणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी गोदाघाटावरून अटक केली. तपासणीदरम्यान त्याला टायफाॅइड असल्याचे निदान झाल्याने, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्रगुण मुरलीधर गोरे (५०) असे संशयिताचे नाव असून, तो गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. मंगळवारी (दि. ४) छत्रगुण आणि त्याची पत्नी सविता यांच्यात घरात वाद झाला. संतापाच्या भरात छत्रगुणने पत्नीवर कोयता आणि कुकरने वार करून तिचा खून केला. सायंकाळी मुलगी मुक्ता लिखे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गंगापूर पोलिस ठाण्यात छत्रगुणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला गोदाघाटावरून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत टायफाईड निदान झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.