Stock Market | सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला, 'या' हेवीवेट शेअर्समध्ये विक्री

2 hours ago 1

अर्थभान

Nifty २६ हजारांच्या खाली घसरला

Stock Market Updates Sensex Nifty

आज सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले.file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Sep 2024, 4:58 am

Updated on

30 Sep 2024, 4:58 am

पुढारी ऑनलाईन डेस्क

संमिश्र संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात आज सोमवारी (दि.३०) घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ८४,९०० च्या खाली आला. तर निफ्टी सुमारे २०० अंकांच्या घसरणीसह २५,९८० वर व्यवहार करत आहे. मुख्यतः रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि आयसीआयसीआय या हेवीवेट शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एसबीआय, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि टीसीएस हे शेअर्सही घसरले आहेत. तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, टायटन या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही लाल रंगात व्यवहार करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article