टीम इंडियामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. टीम इंडियातून 10 खेळाडूंचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्या 10 खेळाडूंच्या जागी 9 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा बदल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी करण्यात आला आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका ही 4-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियात टी 20i मालिकेसाठी 15 खेळाडूंना संधी देण्यात आली होती, त्यापैकी 10 खेळाडू हे एकदिवसीय मालिकेचा भाग नाही. वनडे सीरिजसाठी इतर 9 खेळाडूंचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
या 10 खेळाडूंना बाहेरचा रस्ता!
टीम इंडियातून कोणत्या खेळाडूंना बाहेर करण्यात आलं? कुणाचा समावेश करण्यात आलाय? हे जाणून घेऊया. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, रमनदीप सिंह, रिंकु सिंह आणि ध्रुव जुरेल यांचा एकदिवसीय मालिकेसाठी समावेश करण्यात आलेला नाही. सूर्यकुमार, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रवी बिश्नोई आण तिलक वर्मा हे खेळाडू टी 20i मालिकेतील पाचही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग होते.
तर रिंकु सिंह पहिल्या 3 सामन्यांमध्ये खेळला. ध्रुव जुरेल आणि शिवम दुबे या दोघांना प्रत्येकी 2-2 सामन्यात संधी मिळाली. तर रमनदीपला फक्त 1 सामन्यात खेळायचं भाग्य लाभलं.
या 9 खेळाडूंना वनडे सीरिजसाठी संधी
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. कुलदीप ऑक्टोबर तर श्रेयस ऑगस्ट 2024 नंतर वनडे मॅच खेळताना दिसणार आहेत.
अशाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियात झालेला हा बदल तुम्हाला समजलाच असेल. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना हा 6 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).