संसदेत चित्रपट पाहण्यासाठी पीएम मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह पोहोचलेx account
Published on
:
03 Dec 2024, 9:46 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - गुजरातच्या गोध्रा कांडवर आधारीत चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' १५ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपट २ तास ७ मिनिटांचा आहे. संसदेत हा चित्रपट पाहण्यासाठी पीएम मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत अनेक मंत्री-खासदार आणि अभिनेते विक्रांत मेसी देखील पोहोचले. (The Sabarmati Report)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार (२ डिसेंबर) रोजी संसदेच चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' पाहिला. संसदेच्या बालयोगी ऑडिटोरियममध्य़े या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी पीएम मोदी यांच्यासमवेत अमित शाह, राजनाथ सिंह, अन्य खासदार, मंत्री आणि चित्रपटाीतल अभिनेता विक्रांत मेसीने हजेरी लावली. (The Sabarmati Report)
Administrator
स्क्रीनिंगनंतर पीएम मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर चित्रपट निर्मात्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिलं की- "द साबरमती रिपोर्ट'च्या स्क्रीनिंगमध्ये एनडीए खासदारांसमवेत सहभागी झालो. मी चित्रपट निर्मात्यांच्या प्रयत्नासांठी त्यांचे कौतुक करतो."
फेक नेरेटिव्ह काही काळासाठी असतात
पीएम मोदी यांनी याआधीही 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक केले होते. त्यांनी X अकाऊंटवर लिहिले होते की- "ही चांगली गोष्ट आहे की आता सत्य समोर येत आहे. तेदेखील असे की सामान्य लोकदेखील ते पाहू शकतील. एक फेक नेरेटिव्ह काही काळासाठीच राहतो. शेवटी, फॅक्ट्स समोर येतात."
मोदी यांनी लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.