शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 4:49 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:49 am
ठाणे : निष्ठा स्वाभीमान नावाचा प्रकार आताच्या भाजपाला राहिलेला नाही, लोकांची घरे पेटवणारे असे भाजपाच्या राजकीय गर्भात इतर पक्षाचे बीजे वाढली असल्याने त्यामुळे आताची भाजपा संकरित भाजपा झाली आहे. भाजपाचे हिंदुत्व लोकांचे घर पेटवणारे असून शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे.
शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डोंबिवली विधान सभा मतदार संघाचे दिपेश म्हात्रे व कल्याण ग्रामीण विधान सभेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी उध्दव ठाकरे, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, गुरुनाथ खोत, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, काँग्रेस नेते संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, वैशाली दरेकर, आघाडीचे उमेदवार दिपेश म्हात्रे व सुभाष भोईर आदींसह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यावेळी मोदी शहाच्या महायुती वर टीकेची झोड उठवली.
भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री यांनी मताचे धर्मयुद्ध करा या घोषणेकडे निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करून लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मशाल गीतावर आक्षेप घेतला होता तर भाजपाच्या मताचे धर्मयुद्ध करां हे कसे खपून घेता असा सवाल निवडणूक आयोगाला केला.
पूर्वीच्या भाजपा व आर एस एसच्या कार्यकत्यांनी घरावर तुलापत्र ठेऊन पक्ष वाढविण्यासाठी घरदार सोडून त्यावर बेलपत्र वाहिले, अविवाहित राहिले. मात्र आत्ताच्या भाजपा मधील चित्र पाहिले तर याच संकरित भाजपा साठी संघाच्या आणि भाजपामधील तत्कालीन कार्यकत्यांनी आयुष्य पणाला लावले होते का? असा सवाल करीत अटलबिहारी, अडवाणी व प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी निष्ठेने पक्षा संघटना चालवली. २०१४ मध्ये मिठाचा खडा पडला, त्यामुळे आताच्या भाजपा मध्ये नीतिमत्ता नावाचा प्रकार राहिलेला नाही. आर.एस एस संघ परिवाराला १०० वर्ष होणार आहेत. आताच्या भजपाची भुमिका वापरा आणि सोडा असून त्यांनी जे शिवसेनेच्या बाबतीत केले आहे ते संघाच्या बाबतीत बिजेपीवाले करीत असा इशारा संघाला उध्दव ठाकरे यांनी दिला.
मुंबई ठाणे व अन्य शहरात विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाची कामे सुरू असून विकासाच्या नावाखाली या कामातून कॉन्ट्रॅक्टर ही राजकीय मंडळी आपले खिसे भरत आहेत. आमचं सरकार आलं तर यांना जेल मध्ये टाकून खडी फोडायला लावणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सर्वच उद्योग धंदे महाराष्ट्र बाहेर गुजरातला नेत असल्याने आता महाराष्ट्राचे नाव अडाणी द्यायचे का? असा सवाल उपस्थितांना त्यांनी यावेळी केला.